टकारी समाज संघ

टकारी समाज संघ

टकारी समाज संघ - महाराष्ट्र

च्या संकेतस्थळावर आपले स्वागत !
Carousel001

विमुक्त्त जमातीच्या अखिल भारतीय अधिवेशनात मा. ना. पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या समवेत श्री भीमराव जाधव (गुरुजी)

Carousel004

आदिवासी संशोदन व प्रशिक्षण संस्था येथे माननीय समाज बांधवांसह श्री मोहन भीमराव जाधव

Carousel005

शरदचंद्रजी पवार ह्यांच्या सोबत चर्चा करताना दलितमित्र श्री भारत जाधव व माननीय समाज बांधव

previous arrow
next arrow

प्रस्तावना

कै. भिमराव राजाराम जाधव

१९ फेब्रुवारी १९२३ - १७ जुलै २०१६

विमुक्त जाती च्या उत्कर्षासाठी आयुष्य वेचलेले टकारी समाजाचे जैष्ठ नेते
कै. भिमराव जाधव (गुरुजी), सोलापुर ह्यांचे मनोगत

" स्वातंत्र्यासाठी लढलेला टकारी समाज स्वातंत्र्यानंतरही उपेक्षितच ! "

टकारी समाज बांधबांचे लक्ष्य लक्ष्य अभिवादन!

माणूस जन्मताच गुन्हेगार नसतो. त्या वेळची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. तथापी ब्रिाटीश राजवटीमध्ये ब्रिाटीशांनी सन 1871 मध्ये एक काळा कायदा पास करून टकारी, कैकाडी, पारधी, पामलोर, भाट वगैरे जमातीतील लोकांना ज्न्मजातच गुन्हेगार ठरविले आणि त्यांना तारेच्या कुंपनात बंदिस्त करून ठेवले. विमुक्त समाजातील सर्वच जातींना गुन्हेगार जाती म्हणून संबोधले जात होते. परंतू या जाती जमातींनी केलेली गुन्हेगारी ही त्यावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी नव्हती तर ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी होती| या विषयीचे अनेक दाखले इतिहासात पहायला मिळतातस्वराज्य निमिर्तीसाठी लागणारे धन, दौलतही इंग्रजांच्या तिजोर्या फोडून आणायची कामे करणारा टकारी समाज स्वदेशात मात्र गुन्हेगार ठरतो ही या देशाची व समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. आमच्या टकारी जातीतील जैष्ट नेते कै. भिमराव राजाराम जाधव, सोलापुर हयांच्या व त्यांच्या सहकार्यांचा अथक प्रयत्नानंतर सन 1949 मध्ये हा काळा कायदा मुंबर्इ प्रांता पुरता रदद झाला व आपल्या समाज बंधन मुक्त विमुक्त झाला.

ब्रिटिशांच्या गॅझेट मध्ये पारधी, टाकणकर आणि टकारी ही एकच जात दाखविण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर  पारधी आणि टाकणकर या जमातींना अनुसुचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले परंतु टकारी जात मात्र उपेक्षितच राहिली.

नाही म्हणायला महाराष्ट्र शासनाने या समाजास विमूक्त अ गटात अंतर्भूत केले. त्यांना शिक्षण व नोकरीसाठी काही सवलती दिल्या मात्र देशपातळीवर महाराष्ट्रातील या टकारी समाजास उपेक्षितच ठेवले. महाराष्ट्र शासनाच्या वरील सवलतींमुळे टकारी समाजात थोडयाफार सुधारणा झाल्या. काही तरूण शिक्षित व उच्च शिक्षित झाले. राज्य शासनात उच्च पदावर नोकरीस लागले.

सन 1960 मध्ये विमुक्तांच्या देश पातळीवर वरील अधिवेशन सोलापुर येथे झाले असता आदरणीय कै. पंडीत जवाहरलाल नहेरूंनी सर्वच विमुक्त जातींना आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबददल सुतोवाच केले होते. तसेच सन 1989 मध्ये आदरणीय राजीव गांधीनी यास मान्यता दिलेली  होती. तथापी गेल्या 57 वर्षात या समाजास न्याय देण्यासाठी अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी राज्यमंत्र्यांनी उदासिनताच दाखवली आहे.

केंद्र व राज्य सरकारने आमच्या या टकारी समाजासह विमुक्तातील सर्वच जातींना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अशी आमची आग्राहाची मागणी आहे.

टकारी समाजाचा इतिहास

टकारी समाजाची मातॄभाषा ही अपभ्रंषित तेलगु आहे. बहुधा हा समाज फार पूर्वी आंध्रामधून जुन्या मुंबर्इ प्रांतात स्थलांतरीत झालेला दिसतो. टकारी समाजाच्या रूढी रितीरिवाज या अनुसूचित जमातीप्रमाणेच आहेत.

टकारी समाजात मुख्येत्वे गायकवाड व जाधव अशी दोनच आडनावे आढळून येतात. जाधवांचे कासकोनुरू पपनोरू व गायकवाडांचे भुमेनोरू मिनगलोरूअसे गोत्र आहेत. जाधव व गायकवाड यांच्यातच रोटी बेटीचे व्यवहार होतात. टकारी समाजात लग्न ठरविताना वर पक्षाकडून वधुपक्षाला हुंडा म्हणून दारू देण्याची प्रथा होती. त्यास सुल्ला व ओली म्हटले जायचे. कर्नाटकातील जुन्या बाँम्बे इलाक्यातील सौंदत्ती व महाराष्ट्रातील कोन्हाळी गावातील यल्लम्मा देवी ही मुख्यत्वे या समाजाची कुलदैवत आहे.

टकारी समाज हा कर्नाटक आंध्रप्रदेश मध्ये घंटीचोर, गिरणी वडड्रर, वडूर वगैरे नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात आपला समाज टकारी भामटा, पाथरूट, कामाटी, उचले वगैरे नावाने ओळखला जातो.

देशभरात आमच्या या जातीस टकारी या एकाच नावाने संबोधले जावे अशी आमची मागणी आहे. शासनाने याबाबत योग्य ती कारवार्इ करावी.

टकारी समाज पूर्वी राजाश्रयास होता. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मस्तानीशी लग्न करून त्यांना मौजे पाबळ या गावी महाल बांधून ठेवले होते. त्यावेळी मस्तानीच्या रक्षणार्थ टकारी समाजाचे विश्वासु शुर तरूण असायचे. सातारा संस्थानातही हा समाज राजेंच्या सेवेशी रूजू असल्याच्या नोंदी इतिहासात आहेत.

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्ध समाजात स्वराज्य निर्मितीचे वारे वाहू लागले. स्वदेशीच्या भावनेने समाज भारावून गेला. इंग्रजां विरुद्ध दोन हात करायचे तर धन पाहिजे आणि ते धन मिळवण्यासाठी टकारीसमाजाने इंग्रजांच्या तिजो-या फोडण्यास, तसेच श्रीमंतांची घरे लुटण्यास सुरुवात केली. स्वराज्यासाठी लढणारे किंवा स्वराज्याचा ध्यास घेतलेले त्याकाळचे जे राजे महाराजे होते त्यांना मदत करण्याचे काम टकारी समाजाने केल्याची नोंद इतिहासात आहे.

टकारी समाज हा मुख्येत्वे आंध्र, जुन्या बाँम्बे इलाक्यात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात आढळतो. आंध्र कर्नाटक या राज्यात या समाजास अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना राज्यशासना सह केंद्रशासनाच्या सर्वच सवलती मिळतात. महाराष्ट्र राज्यात मात्र या समाजास अनुसूचित जाती जमाती मध्ये न घेता महाराष्ट्रापुरते विमुक्त अ हा प्रवर्ग निर्माण करून राज्यापुरते काही सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे आमचा हा समाज महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या नोकरी राजकीय शैक्षणिक सारख्या सोयी सवलती पासुन वंचित राहिला.

शन 1949 पासुन आजतागायत या समाजास अनुसूचित जमातीमध्ये अंतार्भाव करण्यासाठी समाजातील कै. भिमराव राजाराम जाधव सोलापुर, कै. मारूतराव जाधव बारामती यासारख्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नास अद्याप यश आले नाही हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल.

विमुक्त अ या प्रर्वगातील सर्व जातींचा टकारी जातीसह अनुसूचित जातीमध्ये अंतर्भाव करावा अशी आग्रहाची मागणी आहे.

समाजाची उद्दीष्ट व विचार

वर्तमान परिस्थीतीमध्ये लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील टकारी समाजातील सर्वांना एकत्र आणून, समाजातील कमजोर घटकामध्ये सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदॄष्टया जागॄती निर्माण करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील टकारी समाजाची जनगणना हे आमच्या पुढील व्दितीय उद्दिष्ट राहील.

केंद्र शासन स्तरावर प्रयत्न करून टकारी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होर्इल अर्से पाहणे. यामुळे टकारी समाजास केंद्र शासनाच्या सर्व सोयी सवलती उपयोगिता येतील. त्यांना केंद्रशासन स्तरावरून सामाजिक शैक्षणिक नोकरीमध्ये तसेच राजकीय बाबींमध्ये सवलती मिळू शकतील.

  •  शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांची ज्योत, आमची प्रमुख मार्गदर्शक आहे.
  • समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणून एकजूट निर्माण करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
  • टकारी समाजातील विविध संघटनांना एका छत्रा खाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.
  • सर्व समाजामध्ये बंधुभाव व मदतीची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • टकारी समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक व वैचारिक उन्नती साठी कार्य करणे.
  • समाजात असणाऱ्या अनिष्ट – रुढी या आमच्या प्रमुख शत्रू आहेत. उदा. व्यसन, अंधश्रध्दा, हुंडा, स्त्रियां वरील अत्याचार.
  • समाज बांधवांवर होणार्या अत्याचार व अन्यायाला सनदशीर मार्गाने वाचा फोडणे व त्याचापाठपुरावा करणे.
  • आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
  • या संकेतस्थळाद्वारे एक सामाजिक जागृती निर्माण करणे तसेच समाज संघटनातून सकारात्मक ‘चळवळ‘ तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असू.

स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट उजळून 64 वर्षे उलटून गेली तरीही आम्हां भटक्या-विमुक्तांच्या वाटयाला उपेक्षा, अवहेलना आणि अन्यायच आहे. या विचांरानी उद्दिग्न होवून शाहू – फुले -आंबेडकर विचारांच्या प्रेरणेतून आम्ही हा प्रयत्न करत आहोत.

सर्व ‘टकारी ‘ बांधवाना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या प्रयत्नांना साथ द्यावी व प्रयत्नांत सामिल व्हावे.

‘‘ जयहिंद जय टकारी

टकारी समाजाची सद्यस्थिती

टकारी समाजाची लोकवस्ती आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यां मध्ये आहे. समाज महाराष्ट्रात विशेष करून सोलापूर, अककलकोट, सातारा जिल्हयात उंब्रज, फलटण येथे आहे. सांगली जिल्हयात कौलापुर, गोटखिंडी, एकांबे, कोल्हापूर, पुणे. व पुणे जिल्हयामध्ये ह्ममुंढवा, बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, बोपखेल, काळेवाडी भोसरी, वारजेमाळवाडी, सांगवी, गुरवपिंपळे तसेच दौड, बारामती, वडगाव निंबाळकर, सोमेश्वर करंजे, मोरगाव, काराठी, व अहमदनगर जिल्हयामध्ये मिडशिंगी, शिंदे राहता, शिर्डी, व उस्मानाबाद जिल्हयामध्ये कवठे, लातूर, जळगाव, भुसावळ, बीड, जालना, नाशिक, निफाड तसेच ठाणे मुंबर्इत अंबरनाथ, बदलापुर, घाटकोपर तसेच या भागात अकोला, मुतिद्दजापुर असा विखुरला गेला आहे.

टकारी समाज विमुक्त असला तरी मूळचा हा भटका समाज आहे. त्यामुळे सततची स्थलांतरे, स्थावर मालमत्तेचा अभाव, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता निरक्षरताइ. समस्यां मुळे ग्रासलेला आहे. टकारी समाज हा मुळचा आंध्र प्रदेशातील. या समाजाची तेलगू ही बोली भाषा. धिप्पाड शरिरयष्टी असणारा हा समाज आंध्रात गोदावरी खोर्यात पिढ्यान्पिढ्या रहात होता. तेलगू ही बोली टकारी समाजातीललोक बोलतात. टकारी जमातीची सर्वात प्रमुख समस्या ही निरक्षरता – शिक्षणाचा अभाव हा आहे. आजही 50 % पेक्षा जास्त समाज शिकलेला नसावा. समाजाच्या सर्व समस्यांचे मुळही ‘अविद्या‘ आहे. जोपर्यंत समाज शिकत नाही तो पर्यंत तो प्रगती करु

शकत नाही. समाजास महाराष्ट्रापुरते का होर्इना आरक्षण मिळाले. परंतु टकारी समाज याचा लाभ उठवण्यास असमर्थ ठरला आहे. या ससामाजिक, आर्थिक बाजूही जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील जातीयवादी राजकीय परिस्थिती यास प्रमुख कारणीभूत ठरते. समाजास राजकीय व आर्थिक आधार नाही. यामुळे ‘तरुण‘ मुले खचलेल्या अवस्थेत आहेत. शिक्षण उपलब्ध करुन देणे, समाजास नवचेतना मिळेल, एक नवी दिशा मिळेल. बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे

” शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा ” हे अंमलात आणणे गरजेचे आहे. सध्याचा काळ हा स्थित्यंतराचा काळ आहे. जागतिकीकरण, खाजगीशिक्षण, अर्थव्यवस्थेत आलेला उदारमतवाद, जातीय राजकारण इ. घटनांमुळे टकारी समाजा सारख्या इतरही समाजास नुकसान होत आहे. आता जर आपण जागे होउन एकत्र आलो नाही तर मग कधी होणार ?

आम्ही अत्यंत नम्रपणे सर्व समाजातील शिक्षित तरुणानां विनम्र आवाहन करु इच्छितो.

समाजाच्या या पयत्नास तन, मन व धनाने सहकार्य करावे. आपल्या गोर गरिब समाज बांधवांसाठी हातभार लावावा. केंद्र शासनानेही समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे जेणेकरून या समाजातील तरूणांना केंद्र शासनाच्या नोकरीत तसेच राजकीयदॄष्टया लाभ हो शकेल. महाराष्ट्र शासनाच्या उदात्त धोरणांमुळे समाजातील काही तरूण शिक्षित झाले. उच्च शिक्षित झाले व उच्च पदावर आज कार्यरत आहेत. आमच्या या माध्यमातुन समाजातील तरूणांना आवाहन करू इच्छितो. या प्रयत्नात आपण सर्वांनी सहभागी व्हावे.

न्यायाच्या शोधात समाज

टकारी समाजाची लोकवस्ती आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, या राज्यांमध्ये आहे. आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्ये या समाजास अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गात ठेवण्यात आला आहे . टकारी समाजास भारतीय संविधानात इमाव , अनुसूचित जाती व जमाती या विषयी ची तरतूद करण्यात आली . परंतु टकारी समाजाचा प्रश्न तसाच राहिला. १९५० नंतर जे प्रयत्न झाले ते अपूर्ण आणि लाल फितीत अडकून पडले. टकारी ही जमात अनुसूचित जमाती या प्रवर्गात येवू शकते. पालीवर राहणे, प्रेतांना पुरणे, तेराव्या च्या पध्दती, विशिष्ठ तेलगु बोली, स्थलांतरित आयुष्य, जनावरांचे बळी देणे, अनार्य देव देवताइ . चाली रीती या टकारी समाजात आहेत तशाच त्या अनुसूचित जमाती मध्ये सुद्धा असतात. कायदेशीर व्याखेनुसार टकारी जमात अनुसूचित जमाती मध्ये यायला हवी. असे असतानाही महाराष्ट्र शासनाच्या उदासीनते मुळे आणि टकारी जातीचा आत्मघातकी अज्ञानामुळे , आजही टकारी संधीच्या आणि न्यायाच्या शोधात चाचपडत आहे. जमातीची जीवन शैलीहि अनुसूचित जमातीशी मेळ खाते. असे असतानाही आमच्या वर हा अन्याय आणि दुर्लक्ष का ?

आभार,
गाव कुसात सामावून घेण्याचा व त्यांना आरक्षण देण्याचा राज्य कर्त्यांकडून प्रयत्न झाला नाही. ही या समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध साधनाच्या आधारे तरुणां मध्ये संवाद साधता यावा, समाजातील प्रश्न, त्यावर उपलब्ध असलेले उपाय याची देवाण घेवाण व्हावी या जाणीवेतून या संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे.

“जय टकारी”

टकारी समाज संघ – महाराष्ट्र प्रदेश

सर्व पदाधिकारी व सदस्य

वृत्त्त विशेष

व्यवस्थापक वृत्त्त - फलक

दिनांक: ३०/०९/२०२१

लवकरच संकेतस्थळावर विचारमंथन नावाचे सदर चालू होईल त्यात आपण आपले विचार मांडू शकतात व समजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांची माहिती पुरवु शकतात . सध्या आपणास कोणती ही माहिती द्यावायची असल्यास खालील email id वर पाठवावी.

satishgaikwad42@gmail.com

संपर्क:
सतिश गायकवाड (सचिव)
९९२२५६५६७८ / ९९२१५६५६७८

ट्विटर वृत्त्त - फलक

मांडा आपले विचार

प्रिय टकारी बांधवांनो आपला समाज खूप मागासलेला आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण मागे राहता कामा नये यासाठीच टकारी समाज (www.TakariSamaj.com) या संकेतस्थळावर तुमचे विचार किंवा आपल्या समाजातील कोणतेही चांगले कार्यक्रम व समारंभ यांची माहिती देता येईल.

आपण दिलेली माहिती त्वरित संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. लवकरच संकेतस्थळावर विचारमंथन नावाचे सदर चालू होईल त्यात आपण आपले विचार मांडू शकतात व समजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांची माहिती पुरवु शकतात . सध्या आपणास कोणती ही माहिती द्यावायची असल्यास खालील email id वर पाठवावी.

संपर्क :- सतिश गायकवाड (सचिव)
satishgaikwad42@gmail.com
९९२२५६५६७८ / ९९२१५६५६७८

संस्थापक टीम

सदस्य
सुनील बाळकृष्ण जाधव

+९१-९६२३८१४६४५

फुगेवाडी, पुणे
सदस्य
हिरालाल यल्लाप्पा जाधव

+९१-९८६०४७३३३६

बीड
सदस्य
अंकूश लक्ष्मण जाधव

+९१-९५४५६८६०९५

लातुर
सदस्य
भरत परशुराम गायकवाड

+९१-९४२३५३४२२७

अम्बरनाथ
सदस्य
विनोद हिम्मतराव गायकवाड

+९१-९९२३४३९९४९

जळगाव भुसावळ
सदस्य
प्रभाकर भिमराव गायकवाड

+९१-८००७७९७३४३

जळगाव
सदस्य
रमेश असोक जाधव

+९१-९५९४९८९६०२

बदलापुर
सदस्य
डॉ किशोर विनायक गायकवाड

+९१-९६२३८१४६४५

कोल्हापुर
सदस्य
प्रशांत हनुमंत जाधव

+९१-९८९०२२२६४७

बारामती
सदस्य
अधिकराव यशवंत जाधव

+९१-९८९०३६५२१२

सातारा उंब्रज